(10/09/09)
पप्पा...
तुम्ही जेव्हा घरी लवकर येत नाही, तेव्हा खुप भिती वाटते.
कुठे असाल तुम्ही? मन विचार करत राहते.
खिडकीपाशी उभी राहून मी तुमची वाट पहाते.
तुम्ही जेव्हा घरी लवकर येत नाही, तेव्हा खुप भिती वाटते.
कुठे असाल तुम्ही? मन विचार करत राहते.
खिडकीपाशी उभी राहून मी तुमची वाट पहाते.
तुमच्या वीणा घर खूप सुने सुने वाटते,
नसतात जेव्हा घरी तुम्ही, मनी काही नाही सुचते.
नसतात जेव्हा घरी तुम्ही, मनी काही नाही सुचते.
"मुलगी हे परके धन!" असे म्हणतात का सारे?
पण पप्पा...
पण पप्पा...
सोडून तुम्हा दोघांना नाही जाणार मी कधी,
विश्वास घात नाही होऊ देणार मी कधी.
नेहमीच तुम्ही माझा पाठिशी उभे राहिलात.
अश्रू माझे पुसण्यासाठी धावून तुम्ही आलात.
अश्रू माझे पुसण्यासाठी धावून तुम्ही आलात.
पुर्ण करताना माझा हट्ट, त्रास तुम्ही सोसला.
माझ्यासाठी कष्ट करताना मात्र तुम्ही तुमच्या इच्छा अपुर्ण ठेवल्या.
तुम्ही जर नसता, तर माझे काय झाले असते?
खंबीरपणे आमच्या सोबत कोण उभे राहिले असते?
रोज सकाळी देवाकडे करते मी एकच इच्छा व्यक्त...
"पुढच्या जन्मात पण हेच आई वडील दे मला फक्त"
"पुढच्या जन्मात पण हेच आई वडील दे मला फक्त"

Comments
Post a Comment